
ही भुमीका म्हणजे आपल ठेवायच झाकून , दुसऱ्याच बघायच वाकून -भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी
राज्यात जनता कोरोनाचा संकटात असताना विद्युत मंडळाचा महावितरण कंपनीने घरगुती विजेची बिले अवाजवी पाठवून लोकांच्या जखमीवर मिठ चोळण्याचे काम सुरू केले आहे. खर तर लॉक डावून काळात संपूर्ण विजबिल सरकारने माफ करायला हवी. शिवसेना नेते खा . संजय राऊत सामनातून केंद्र सरकारचा इंधन वाढीवर लिहतात , मग विजेच्या अवाजवी बिलावर का लिहत नाही ? असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे . सामनाची भुमीका म्हणजे आपल ठेवायच झाकून , दुसऱ्याच बघायच वाकून असल्याची टिका त्यांनी केली आहे.
www.konkantoday.com