
वाढीव दराने खते व बियाण्यांची विक्री करणार्या विक्रेत्यांवरील कारवाईसाठी भरारी पथकांची नियुक्ती
वाढीव दराने खते, बियाण्यांची विक्री केल्याचे आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवरील कारवाईसाठी तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. पथकामार्फत अशा व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत कृषी मंत्र्यानी खरीप हंगामाची माहिती जिल्हाधिकार्यांमार्फत संकलित केली. लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणून खते, बियाण्यांच्या वाहतुकीला रितसर परवानगी देण्यात आली आहे. काही तालुक्यांमध्ये वाढीव दराने खते, बियाण्यांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.
www.konkantoday.com