
लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं ५० टक्के वीज बिल माफ करावे- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं ५० टक्के वीज बिल माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यातलं भरमसाठ बिल आलं आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेलं वीज बिल निम्म्याने माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली
www.konkantoday.com