रेल्वे ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता नाही
कोरोनामुळे देशात २६मार्चला लॉकडाऊन केल्यानंतर रेल्वे वाहतुकही ठप्प झाली होती. आता रेल्वे कधी सुरु होणार याबाबत माहिती मिळाली नसली तरी १ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतीलसुद्धा ट्रेन्सचे तिकिट बूकिंग रद्द करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. म्हणजेच रेल्वे ऑगस्टच्या मध्यापर्यंत सुरु होण्याची शक्यता नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत कोणत्याही प्रवाशाने तिकिट बुकिंग केलं असेल त्यांना १०० टक्के पैसे परत दिले जातील.
रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले की, या काळात केवळ स्पेशल ट्रेन रुळावर धावतील.यामध्ये मे आणि जून महिन्यात घोषणा करण्यात आलेल्या स्पेशल रेल्वेंचा समावेश आहे. जूनच्या सुरुवातीलाच रेल्वेकडून लॉकडाऊनमध्ये सुरू राहणाऱ्या १५अप डाऊन कऱणाऱ्या ट्रेन्सची संख्या २०० केली होती.
www.konkantoday.com