यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा ३५वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक व ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. रोख एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
www.konkantoday.com