मौजे कारवांचीवाडी  कोरोना बाधित क्षेत्र

रत्नागिरी दि. 24 : आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील  कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोटकलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. शासनाने कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक  13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेमधील नियम क्र. ३ नुसार जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
            मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडील आदेशानुसार  उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना Incident Commander म्हणून घोषित केले आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्याकडील आदेशान्वये कोरोना बाधित रुग्णांची वाढणारी संख्या व सदर कामकाज शिघ्रगतीने होण्याच्या दृष्टिने रत्नागिरी उपविभागामधील रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यामध्ये  Containment Zone  (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) घोषित करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, रत्नागिरी यांना प्रदान केले आहेत.
            रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा मौजे कारवांचीवाडी परिसरामध्ये वास्तव्यास आहे. असा प्रस्ताव तहसिलदार रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मौजे कारवांची वाडी परिसरामध्ये  रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून  त्या परिसरामधील भाग  Containment Zone  (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) जाहिर करणे आवश्यक आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मौजे कारवांचीवाडी  परिसराच्या आजूबाजूच्या  परिसर आजूबाजूच्या  परिसर यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदर क्षेत्र Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून जाहिर करण्यात येत असल्याचे विकास सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रत्नागिरी यांनी आदेशीत केले आहे. कोरोना विषाणू बाधित क्षेत्राच्या सिमा सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे राहतील. त्यानुसार संबधित क्षेत्रातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या  लोकांना सदर बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
            सदर आदेश अत्यावश्यक सेवा उदा. सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक इ. वितरीत करणारे/सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत.
            तरी अशा प्रकारचा प्रतिबंध लागू असल्याबाबत रत्नागिरी तालुक्यातील मौजे कारवांचीवाडी त्याच्या आजूबाजूचा परिसर व  कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या आजूबाजूच्या परिसरात येणारी सर्व गावे/ वाडया या मधील सर्व शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे येथे लेखी नोटीस लावून तसेच दवंडी देऊन संबंधित तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी प्रसिद्धी द्यावी.
            विस्थापित मजूर, पर्यटक, विद्याथी, यात्रेकरु व इतर व्यक्ती यांना स्थलांतरणास परवानगी दिली असली तरी Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) मधून अशा व्यक्तींना स्थलांतरणास परवानगी राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम  2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल येईल, असे आदेशात नमूद केलेले आहे.
www.konkantoday.com
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button