भरभक्कम रक्कमेची ग्राहकांना दिलेली वीज बिले वीज कंपन्यांनी मागे घ्यावीत,असे निर्देश राज्यशासनाने द्यावेत -अॅड. दीपक पटवर्धन
राज्य सरकारचे चित्त थाऱ्यावर नाही. जनता अडचणींचा सामना करत असतांना राज्यशासन अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, औद्योगिक या सर्वांना हायहोल्टेज शॉक देत आहे. सरकारची ही कृती असंवेदनशीलतेचा कळस म्हणण्यासारखी आहे.
वीज बिलांची आकारणी कशी झाली, ती बरोबर की चूक,हप्त्याने बिल भरणे वैगेरे सगळ्या तांत्रिक मुद्यात सरकार स्वतः केलेली चूक दडवू पाहत आहे. प्रचंड मोठ्या रक्कमेची बिले पाठवून जनतेची क्रूर चेष्टा राज्यसरकारने चालवली आहे.
कोरोनाच संकट गडद असतांना आकारणी कशी योग्य आहे.त्याचा आधार हिशोब काय आहे, हे सांगून जनतेची दिशाभूल चालू आहे.कोरोनाच्या या संकट काळात अव्वाच्या सव्वा काढलेली बिल वितरण कंपन्यांनी तात्काळ मागे घ्यावी, असे निर्देश राज्यशासनाने तात्काळ द्यावेत.अन्यथा या बेमुर्वतखोर पध्दती विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा अॅड. दीपक पटवर्धन जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. यांनी
दिला आहे.