भरकटलेल्या जहाजातील तेल काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात, डीजी शिपिंग कंपनीचे तंत्रज्ञ जहाजावर दाखल
निसर्ग चक्रीवादळात भगवती बंदरात भरकटलेले बसरा स्टार या जहाजातील ऑईल काढण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी भारत सरकारच्या डिजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी यांनी जहाजाचे कप्तान व कर्मचारी यांना घेवून जहाजाची तपासणी केली. त्यानंतर या जहाजातून जळके डिझेल काढण्यास सुरूवात करण्यात आली आहे. समुद्राच्या लाटांनी हे जहाज किनार्यावर आदळत असल्याने या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. मात्र त्यातूनही पावसाने विश्रांती घेतल्याने हे काम सुरू ठेवण्यात आले आहे. सुरूवातीला या जहाजातील ऑईल काढण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जहाजात असलेले २५ हजार लीटर डिझेलसाठाही सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येणार आहे. बंदर अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सध्या सुरू आहे.
www.konkantoday.com