पर्यटन विभागाच्या बीच शॅक धोरणाबाबत पर्यटन संचालक श्री. दिलीप गावडे फेसबुकवरुन सविस्तर माहिती देणार
पर्यटन विभागाच्या बीच शॅक धोरणाबाबत पर्यटन संचालक श्री. दिलीप गावडे हे शनिवार दि. २७ जून रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवरुन सविस्तर माहिती देणार आहेत. MaharashtraTourismOfficial या फेसबुक पेजवरुन या संवादाचे प्रसारण होईल.
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या धोरणांतर्गत महाराष्ट्रातील ८ समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना ८० टक्के रोजगार देणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती पर्यटन संचालक श्री. दिलीप गावडे हे फेसबुक संवादातून देणार आहेत.
www.konkantoday.com