निसर्ग चक्रीवादळामुळे ५८५ नौकांचे २४ लाखांचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळाचा फटका किनारपट्टी भागाला बसला आहे. गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यातील मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सहाय्यक मत्स्य विभागाने केलेल्या पंचनाम्यात ५८५ नौकांचे सुमारे २४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धनजवळ लँड झाले आहे. त्यामुळे दापोली, मंडणगड, गुहागर तालुक्याला फटका बसला आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी ४ जूनपासून पंचनामे करीत आहेत. मच्छिमार नौकांसह मत्स्य संवर्धन तलावांच्याही नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. १९ जूनपासून झालेल्या पंचनाम्यांमध्ये ५८५ नौकांचे अंशतः नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com