दिपक नोवाकॅमच्यावतीने पोलीस विशेष पथकाला ९० सेफ्टी बॉडी प्रोटेक्टीव्ह गिअर कीट
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाला दिपक नोवाकॅमच्यावतीने ९० सेफ्टी बॉडी प्रोटेक्टीव्ह गिअर कीट देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या विशेष पथकाचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी केला जातो. अनेकवेळा जमावाकडून पोलिसांवर दगडफेक केली जाते. त्यामुळे पोलीस जखमी होतात. आता या पथकाला बॉडी प्रोटेक्टीव्ह गिअर कीट उपलब्ध झाल्याने या पथकाचा आत्मविश्वास उंचावेल असे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी यावेळी सांगितले.दिपक नोवाकॅमच्या सीआरएसमधून ही ९० कीट उपलब्ध झाली असून त्यामुळे हे जवान आता अधिक सुरक्षित राहतील.तसेच जवानांकडे ही अत्याधुनिक कीट आल्याने जमावावरही त्याचा चांगला प्रभाव पडेल. शिवाय रत्नागिरी पोलीस दल अत्याधुनिक साधने वापरून समर्थ असल्याचा संदेशही जनतेत जाईल असे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी सांगितले.या कार्यक्रमाला कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com