
काल राज्यात ४८४१ नवीन रुग्णांचे निदान
महाराष्ट्राचा २५ जून रोजी राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या कोरोना रिपोर्टनुसार (Covid-19 Report) कालराज्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या समोर आली आहे. काल राज्यात ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण चिंतेचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. राज्यातील एकूण अॅक्टीव रुग्णांची संख्या ६३,३४२ झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
काल ३६६१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ % एवढे झाले आहे.
www.konkantoday.com