
होम क्वॉरंटाईन केलेला नाभिक केस कापताना आढळला, गुन्हा दाखल
रत्नागिरी मुरूगवाडा येथील रामप्रकाश सेन हा होम क्वॉरंटाईन असताना देखील त्याने मुरूगवाडा येथे जावून भोळेवाडी येथील पानगले यांचे केस कापत असताना नाभिक संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण व बाळकृष्ण चव्हाण यांना आढळून आला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीस स्थानकात माहिती दिली. पोलिसांनी आरोपी रामप्रकाश याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com