विविध कार्यकारी संस्थेत १ लाख ९४ हजाराचाअपहार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेत काम करणारा अजित अनंत राऊत राहणार उभळे (चिपळूण ) याने संस्थेत १ लाख ९४हजाराचा अपहार केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरुद्ध चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे
राऊत हा या संस्थेत कामाला असताना त्याने संस्थेमध्ये बोगस बँक भरणा,शिल्लक रक्कम कमी जास्त लिहिणे ,कर्जदारांची बँक वसुली बुकला जमा न करता ती रक्कम स्वतःसाठी वापरणे असे करून संस्थेचा एक लाख ९४ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केला व त्यानंतर ही रक्कम उशीरा जमा केली या आरोपावरून त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com