
विद्यापीठ अनुदान आयोगची अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत चाचपणी
राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा शासनाने ऐच्छिक केल्या असताना आता विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत चाचपणी करत आहे. त्याचप्रमाणे नवे शैक्षणिक वर्ष ऑगस्टऐवजी ऑक्टोबपर्यंत पुढे ढकलण्याचाही प्रस्ताव आयोगासमोर आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशी डावलून राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्यानंतर या निर्णयावरून वादंग निर्माण झाला.
www.konkantoday.com