वाढीव बिलांबाबत चिपळूण काँग्रेसची महावितरणवर धडक
चिपळूण तालुका काँग्रेसने आज
गुरुवारी चिपळूणच्या महावितरण कार्यालयावर धडक दिली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर ही धडक देण्यात आली. काही लोकांची बिले अव्वाच्या-सव्वा आली आहेत. लाॅकडाऊन काळातील बिले माफ करणे, हा निर्णय शासनस्तरावर आहे. आम्ही आमच्या माध्यमातून ही बिले कमी व्हावीत किंवा माफ व्हावीत, यासाठी प्रयत्न करीत आहोत. काँग्रेसकडेच ऊर्जा खाते आहे. परंतु लाॅकडाऊनमुळे हैराण झालेल्या लोकांना या वाढीव बिलांमुळेमुळे शॉक बसला आहे. त्यातच महावितरणकडून योग्य उत्तरे दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये संताप आहे. महावितरणच्या कार्यालयात वाढीव बिले, लोकांच्या तक्रारी या संदर्भात माहिती घेण्यासाठी व माहिती देण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करा, अशी महत्वपूर्ण मागणी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या वेळी केली.
गोवळकोट, कालुस्ते भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, याबाबत महिला तालुकाध्यक्ष गौरीताई रेळेकर यांनी तक्रार केली. काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या भावना तीव्र होत्या. लाॅकडाऊन काळातील बिले लोकांनी भरू नयेत, पुढील बिले लोकांना पाठवावीत. या तीन महिन्यातील बिलांबाबत शासन स्तरावरून निर्णय होईल, बिले माफ होतील किंवा हप्त्यावर भरण्याची सवलत मिळेल, असे प्रशांत यादव यांनी या वेळी सांगितले
www.konkantoday.com