टपोरी माणसाने तोंड सांभाळावे -चिपळूणचे माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम कडाडले
अरे कोण हा पडळकर…? शरद पवार साहेबांना पंतप्रधान मोदी साहेब गुरू मानतात आणि हा टपोरी ..काल आमदार झाला आणि शरद पवार साहेबांवर बोलतो..? तुझी लायकी काय आहे हे आम्हाला माहीत आहे…तोंड संभाळून बोल.. अशा कडक शब्दात चिपळूणचे माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी आम.गोपीचंद पडाळकर यांना फटकारले आहे…
प्रत्येकवेळी समाजाचा आधार घेऊन राजकारण करायचे आणि प्रसिद्धीत राहायचे हे पडाळकर यांचे उद्योग आम्हाला माहीत आहेत.अनेकवेळा मा.शरद पवार यांचे पाया पडताना आम्ही या पडळकर यांना बघितले आहे.आता कालपरवा आमदार झाल्यावर यांना कंठ फुटला आहे….देवेन्द्र फडणवीस जे स्वतःच्या तोंडून बोलू शकत नाहीत ते असे काहीतरी दुसऱ्याच्या××××तून बोलवून घेतात ही भाजपची जुनी सवय आहे…बाकी सर्व विसरायचे …आणि भानगडी लावून द्यायचे हेच भाजपचे उद्योग आम्हाला माहीत आहेत.
उगाच आमच्या नादाला लागू नका…आता फक्त निषेध केलाय…कोकण अजून माहीत नसेल….पडाळकर … ! तोंड संभाळून बोला फिरणे कठीण होईल…..अशा अत्यंत कडक शब्दात शौकत मुकादम यांनी आम.पडाळकर यांचा समाचार घेतला आहे.
www.konkantoday.com