
गुहागर सेतू कार्यालय तात्काळ सुरू करा- शिवसेनेची मागणी
गुहागर तालुक्यातील कोरोना संकट आणि त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र सेतू कार्यालय बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सेतू कार्यालय सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन शहर शिवसेनेच्यावतीने तहसिलदार लता धोत्रे यांना देण्यात आले आहे.
www.konkantoday.com