
कणकवली स्थानकात रॅपिड टेस्ट संपल्याने प्रवाशांची फक्त थर्मल गनने टेंपरेचर व ऑक्सीमीटरने ऑक्सिजन तपासणी
कणकवली रेल्वे स्थानकात रेल्वेने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड टेस्ट केली जात आहे. मंगळवारी सकाळी कोकणकन्याने आलेल्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात तीन चाकरमान्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आलेल्या राज्यराणीच्या प्रवाशांची फक्त थर्मल गनने टेंपरेचर व ऑक्सीमीटरने ऑक्सिजन तपासणी करुन रजिस्टरला नोंद करण्यात आली. स्थानकातील रॅपिड टेस्ट किट संपल्याने रॅपिड टेस्ट करता आली नाही. त्यामुळे आरोग्य विभाग पथक व अधिकाऱ्यांची किट मिळवण्यासाठी धावाधाव सुरू हाेती
www.konkantoday.com