
अधिक वीजबिले आल्याने वीज ग्राहकांची महावितरण कार्यालयावर गर्दी
मार्च महिन्यापासून महावितरणाने रिडींग घेतले नसल्याने आता तीन महिन्यांची सरासरी बिले महावितरणाने काढली आहेत. मधल्या काळात ग्राहकांनी ऍपवर जावून आपल्या मीटरचे रिडींग कळवावे असे महावितरणने आवाहन केले होते. परंतु अनेक तांत्रिक कारणामुळे ऍप व्यवस्थित ओपन होवू शकले नव्हते. त्यामुळे या योजनेला कमी प्रतिसाद मिळाला होता. आता महावितरणने पाठविलेल्या बिलांमुळे ग्राहक हादरले आहेत. ही बिले वाढीव असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे तर या बिलांची योग्य रितीने आकारणी केली असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. यामुळे रत्नागिरी शहरात देखील महावितरण कार्यालयावर वाढीव बिलाबाबत गार्हाणे मांडण्यासाठी वीज ग्राहकांनी गर्दी केली होती. परंतु बहुतांश ग्राहकांना आम्ही काही करू शकत नाही असे सांगून परत पाठविण्यात आले. शासनाने ग्राहकांनी वीजबिले हप्त्यात भरा अशी घोषणा केली आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. या सर्वामुळे ग्राहकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com