संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
महाविकास आघाडीतील वादानंतर अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळालेली नाही. गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. असं असलं तरी ठाकरे सरकारने अजोय मेहता यांच्यावर वेगळी जबाबदारी दिली आहे. अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.
www.konkantoday.com