
हर्णै येथे मदत वाटपात गैरव्यवहार करणार्यांवर कारवाई करणार -तहसिलदार समीर घारे
निसर्ग वादळामध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भात मिळणार्या आर्थिक मदतीमध्ये हर्णैमध्ये ज्यांनी गैरव्यवहार केला आहे त्याची सखोल चौकशी होवून संबंधितांवर १०० टक्के कारवाई करणार असल्याची ग्वाही यावेळी दापोली तहसिलदार समीर घारे यांनी दिली. प्रचंड गदारोळात मंगळवारी बैठक पार पडली.
गावामध्ये नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून व अंशतः नुकसानकरिता ठराविक रक्कम देण्याचे जाहीर केले. काही दिवसातच पंचनामे झाले परंतु हर्णैमध्ये या मिळणार्या मदतीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला. हर्णै तलाठी कार्यालयातील महिला महसूल कर्मचारी हिच्याकडून ज्यांच्या घरांचे काहीच नुकसान झालेले नव्हते तर काहींचे अंशतः नुकसान झालेले असताना ते पूर्णतःमध्ये दाखवून सरकारने जाहीर केलेल्या १ लाख ६० हजार रुपयांची मदत मंजूर करून घेतली. हे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांचा प्रक्षोभ झाला. गेले कित्येक दिवस हा विषय हर्णैमध्ये गाजत आहे अखेर ग्रामपंचायतीकडून याची चर्चा होवून संबंधिक कर्मचार्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी सोमवारी (२२ जून रोजी) निवेदन दिले. त्यासंदर्भात काल तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
www.konkantoday.com