
वीज कंपनीनं कोणालाही वाढवून वीज बिल पाठवलेलं नाही,ग्राहकांनी ३ महिन्यांचं बिलं हप्ता पद्धतीने भरा- ऊर्जा मंत्री नितीन राऊत
ग्राहकांनी ३महिन्यांचं बिलं हप्ता पद्धतीने भरा असं आवाहनऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. या हप्त्यांवर कोणतंही व्याज नसेल. तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर १०० युनिट वीज मोफत देण्याबद्दल विचार केला जाईल, असं नितीन राऊत यांनी माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसात वीज बिलांचे आकडे ऐकून ग्राहकांना धक्का बसला आहे. ग्राहक वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये लोकं गर्दी करत असल्याचंही दिसत आहे. पण वीज कंपनीनं कोणालाही वाढवून वीज बिल पाठवलेलं नाही. लॉकडाऊनमध्ये घरातील सगळ्याच व्यक्ती घरी होते. त्यामुळे दिवसभर पंखा किंवा इतर स्वरुपात विजेचा मोठा वापर होता. या काळात वीज बिलं न मिळाल्यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सुमारे ६०००कोटी रुपये कर्ज घ्यावं लागलं आहे. आमच्या ग्राहकांना अजिबात फसवलं नसल्याचं राऊत यावेळी म्हणाले.
www.konkantoday.com