लॉकडाऊन काळात निसर्गाशी मैत्री , वनस्पती ओळखणे, तिचे उपयोग एक आगळी वेगळी स्पर्धा
सध्या शाळा, कॉलेज बंद आहेत. सर्व मुले घरीच आहेत. त्यांना निसर्गाची जवळीक साधण्यासाठी सौ. रेखा इनामदार शिक्षिका माध्यमिक विद्यालय वरवडे यांनी एक चांगला उपक्रम राबविला. शिरगांव येथील मुलांना परिसरातील वनस्पतींची पाने, फुले, फळे इत्यादी गोळा करण्यास सांगितले. श्रीकृष्ण दाते यांच्या अंगणात एकत्रीकरण करण्यात आले. मुलांचे गट करून एक स्पर्धा घेण्यात आली. वनस्पती ओळखणे, तिचे उपयोग यावेळी परिक्षक म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी चांगला सहभाग घेतला व वनस्पतींची माहितीही दिली. विठ्ठल भट (७५ वर्षे), शीला भट (७३ वर्षे), श्रीकृष्ण दाते (६७ वर्षे), शशि दात्ये, विजय भट यांनी सहभाग घेतला. परिसरातील काळी मिरी, कडूनिंब, कढीनिंब, निवडुंग, धोत्रा, नागदाणी, दालचिनी, जायफळ, नेचे, बेल, साखरी जांभ, सोनटक्का, कुंभा, करमर सर्पगंधा, इत्यादी वनस्पती जमविल्या होत्या. त्यांचा वेळही छान गेला व आपल्या परिसरात कोणकोणत्या वनस्पती आहेत याची माहिती मिळाली. सौ. रेखा इनामदार यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com