राज्य सरकारचा १ जुलैपासून आंतरजिल्हा प्रवास सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत विचारविनिमय सुरू
राज्य सरकारचा १ जुलैपासून रेड झोन तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्र सोडून इतर ठिकाणी आंतरजिल्हा प्रवास सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील. आता कामगार, मजूर पुन्हा आपल्या कामावर परतत आहेत. विविध साहित्य, वस्तू व्यापाऱ्यांना खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार १ जुलैपासून काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये सूट देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
www.konkantoday.com