प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचा भंग करणार्या व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई होणार
केंद्र, राज्य शासनाच्या सूचनेनुसार पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन कालावधीतही काही अटी, शर्तींवर ठराविक व्यवसाय सुरू करण्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. बंदी आदेश असतानाही काहींनी आपले व्यवसाय सुरू ठेवले आहेत. अशा व्यावसायिकांच्या विरोधात प्रशासनामार्फत तात्काळ कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला आहे.
प्रांत डॉ. विकास सुर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. बंदी असलेले व्यवसाय सुरू आहेत की नाही याची पाहणी या पथकामार्फत केली जाणार आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन केलेल्या व्यावसायिकांवर नियमानुसार कारवाई करण्याची जबाबदारी दक्षता पथकावर सोपविण्यात आली आहे. बंदी आदेश मोडून व्यवसाय सुरू करणार्यांवरील कारवाईचा अधिकार प्रांत, तहसिलदार यांना देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेकांचे छुप्या पद्धतीने सुरू असलेले व्यवसाय पुढील आदेशापर्यंत बंद करावे लागणार आहेत.
www.konkantoday.com