चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता सुबोध भावे पुढे सरसावले
निसर्ग चक्रीवादळाचा कोकण परिसराला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर घरांचे व झाडांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. शासनाबरोबरच अनेक सामाजिक संस्था देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. आता सेलिब्रेटींनी आपला सहभाग नोंदविला आहे. अभिनेता सुबोध भावे व त्यांच्या टीमने चक्रीवादळात नुकसान झालेल्या ४०० कुुटुंबियांना फॅमिली कीट पोहोचविले आहे. त्याचा फोटो सुबोध भावे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला असून लोकांनीही मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com