
काेव्हिड याेध्यामध्ये काेराेना, रत्नागिरीत पोलीस, नर्स,आशा कर्मचारी कोरोना पाॅझेटिव्ह
आता काेव्हिड याेध्यामध्ये काेराेनाची लागण हाेऊ लागली आहे,रत्नागिरीत एका पोलीस, नर्स, आशा कर्मचारी यांचा अहवाल कोरोना पाॅझेटिव्ह आला आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका नर्ससह साखरतर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये सेवा बजावणाऱ्या आशा कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच जेलमधील पोलीस कर्मचारी देखील कोरोना बाधित झाला आहे.
जिल्हा कारागृहातील हा कर्मचारी चार दिवसापासून आजारी असल्याने तो सुट्टीवर होता. काल त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
या सर्वाना कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com