
राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली
राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
दि.९ मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोराना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता १०३ एवढी झाली आहे.
www.konkantoday.com