भरकटलेल्या जहाजावरील ऑईल काढण्यास कस्टम विभागाची परवानगी, लवकरच प्रक्रिया सुरू हाेणार
निसर्ग चक्रीवादळात भरकटून भाटिमिर्या येथे अडकलेल्या जहाजावरील ऑईल काढण्यास कस्टम विभागाने परवानी दिली आहे. ऑईल काढण्यासाठी मुंबईहून काही टँकर रत्नागिरीत पाठविण्यात येणार आहेत.
३ जूनच्या निसर्ग वादळापूर्वी मुंबईहून आलेले जहाज नांगर टाकून मिरकरवाडा बंदरात उभे करून ठेवण्यात आले होते. वार्याच्या वेगाने भरकटलेले जहाज भाटिमिर्या समुद्रकिनारी असलेल्या दगडांमध्ये अडकून पडले. माडाच्या झाडाला बांधून ठेवलेला दोर तुटला आहे. किनार्यावरील जहाज दगडात अडकून पडल्याने ते जागेवरून हलू शकत नाही.
केंद्र शासनाच्या डीजी शिपिंग कंपनीचे टेक्नीशियन मंचलवाल यांनी कॅप्टन, कर्मचार्यांना घेवून जहाजाची तपासणी केली. जहाजात सुमारे २५ ते ३० हजार लिटर ऑईल आहे. ऑईल काढण्यासाठी जहाज मार्गस्थ करणे शक्य नाही. जहाजातील ऑईल काढण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी कस्टम विभागाने दिली आहे. ऑईल काढताना जहाजाच्या आजुबाजूचा परिसर बंद करण्यात आला आहे.
www.konkantoday.com