पतंजली योगपीठाचे कोरोनावरिल आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ आज लॉन्च झाले
कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणल आहे. आचार्य बालकृष्ण यांनी स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत हे आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे..
पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड – 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे.रामदेव बाबा यांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या औषधाच्या वापराने 3 दिवसांच्या आत बरे होतील. पुढच्या 7 दिवसांत कोरोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल. कोरोनिल औषध सकाळी आणि संध्याकाळी एकदा घेतलं जाऊ शकतं. या औषधामध्ये असलेला अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीरातील अँजिओटेन्सीन कनवर्टिंग एंजाइमला शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतं. तर गिलोय संक्रमण कमी करण्यास मदतगार आहे.
www.konkantoday.com