
गॅरेजमध्ये आलेल्या व्यावसायिकांवर धारदार शस्त्राने हल्ला,व्यावसायिक जखमी
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर भागात असलेल्या गॅरेजमध्ये मोटारसायकलच्या दुरुस्तीबाबत चौकशी करण्यास गेलेल्या रत्नागिरीतील दानिश पटेल या व्यवसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी मुकद्दर जमादार राहणार कीर्ती नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पटेल हे रत्नागिरीतील मच्छी मार्केट येथील व्यावसायिक असून त्यांच्या मित्राची मोटरसायकल उद्यमनगर येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीला दिली होती ती पाहण्यासाठी ते तेथे गेले होते त्यावेळी ते गॅरेजच्या मालकांशी बोलत असताना संशयित आरोपी मुकद्दर हा तेथे आला त्याने पटेल यांना शिवीगाळ करून ढकलून दिले त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सावरले त्यावेळी मुकद्दर हा पाठीमागून आला त्याने पटेल यांच्या डोक्यावर छातीवर पाठीवर धारदार हत्याराने वार केले व त्यांना जखमी केले याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com