शासनाच्या २६ मेच्या निर्णयाला रत्नागिरीच्या दिव्यांग समन्वय समितीचा विरोध
२६ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेत अपंगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के सेसमधून खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी पैसे दिव्यांगांच्या खात्यात जमा करण्यासाठी विहित नमुन्यात फॉर्म भरावयाचा आहे. मात्र रत्नागिरी दिव्यांग समितीने या निर्णयाला विरोध करून यासाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी केली आहे.
खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी सही केलेला फॉर्म जोडावयाचा आहे. दहा लाखांपेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा दाखला, मतिमंद असलेल्या दिव्यांगांच्या पालकत्वाचा दाखला, बँक खाते नंबर, आयएफसी कोड आदी ३० जूनपर्यंत पूर्तता करून पंचायत समिती कार्यालयात जमा करावयाचे आहे.
www.konkantoday.com