
वर्ष उलटूनही बीएड गुणपत्रकांचा पत्ता नाही.
रत्नागिरी शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पुढील परीक्षा तोंडावर आली तरी आधीच्या परीक्षेचे गुणपत्रकच देण्यात आलेले नाही. अशातच मुंबई विद्यापीठाकडे म्हणजे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र अद्याप छापलेच गेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना गुणपत्रके मिळाले नाही तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील अभ्यासक्रमास मुकावे लागणार आहे. मात्र मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आणि खुद्द विद्यापीठालाही विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीच काळजी नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे.शासकीय अध्यापक महाविद्यालयात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पदवी परीक्षा पार पडल्या. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षा होवून वर्ष लोटले तरी गुणपत्रकाची वाट पहावी लागत आहे. www.konkantoday.com