
तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका,मुंबई सायबर क्राईमने सावधान राहण्याची केली सूचना
तुमचा पासपोर्ट कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातात देऊ नका. अन्यथा तुम्हाला मोठा संकटाला सामोरे जावे लागेल. कारण मुंबई सायबर क्राईमने सावधान राहण्याची सूचना केली आहे. बनावट पासपोर्ट करुन त्याचा चुकीचा वापर करण्यात येत असल्याची बाब पुढे आले आहे. त्यासाठी सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
सायबर भामटे हे एखादा पासपोर्ट मॉडिफाय करुन बनावट पासपोर्ट बनवतात आणि त्याचा वापर करून सिमकार्ड विकत घेतात. अशा बनावट ओळखपत्रांचा उपयोग करुन विकत घेतली जाणारी सिम कार्ड ही ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि अन्य विघातक कृत्यांसाठी वापरली जात आहेत, असे महाराष्ट्र सायबर विभागाच्या लक्षात आले आहे.
www.konkantoday.com