जहाजावरील कर्मचाऱयांच केस कटिंग केल्याबद्दल गणपतीपुळे येथिल सलून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सलूनवर बंदी केलेली असताना देखील गणपतीपुळे येथे आलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांचे केस कटिंग केले म्हणून गणपतीपुळे येथील नील हेअर कटिंगचे चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जयगड येथे दुरुस्तीसाठी आलेल्या प्रिया -२३या जहाजावरील कर्मचारी यांची रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे कोविड तपासणी केलेली असताना देखील व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचा मनाई आदेश असताना देखील वरील कर्मचाऱयांचे आपल्या सलूनमध्ये केस कटिंग केले या प्रकारामुळे कोरुनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असताना देखील लोकांचे आरोग्य धोक्यात येईल असे वर्तन केले व मनाई आदेशाचा भंग केला म्हणून गणपतीपुळे येथील नील हेअर कटिंग सलूनचे हलिम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button