चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राजापूरात केला चिनचा निषेध
भारत चीन सीमेवर गेल्या काही दिवसात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. देश कोरोना संकटावर मात करत असतानाच चिनी ड्रॅगणने पुन्हा एकदा सिमा भागात कुरापती काढण्यात येत आहेत. नुकत्याच पूर्व लद्दाखच्या गलवान भागात चीनच्या सैन्याकडून झालेल्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहिद झाल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि 22/06/2020 रोजी सकाळी ठिक 11 वाजता राजापूर बाजारपेठ जवाहर-चौक येथे चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून शहिद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.या कार्यक्रमाला प्रांत कार्यासमिती सदस्य श्रीजीत वेलणकर हे उपस्थित होते.चीनी प्रोपोगंडा चालवून भारताविरुद्ध अपप्रचार करणाऱयावर सुद्धा त्यांनी टीका केली.त्यांचं दुःख चिनी सीमेवर भारतीय सेना बांधत असलेल्या रस्त्याचं जाळं हीच आहे. अश्या तुकडे-तुकडे गँग चा जाहीर निषेध आपल्या वक्तव्यातून केला.तसेच ईशान पाळेकर यांनी चिनी मालावर व चिनी Apps वरती बहिष्कार टाकून खऱ्या अर्थाने आपण चीन ला आर्थिक कमजोर करणे म्हणजे आपल्या जवानांना खरी श्रद्धांजली असेल असे वक्तव्य केले.यावेळी निशांत बेलवलकर,अर्पिता चव्हाण, अनुष्का मोहिते,अपूर्वा अभ्यंकर,पूर्वा माणिक,प्रजित जाधव,रोहित सोलगावकर, अभिजित देव, आकाश जाधव,रोशन शिंदे,यश मराठे,सौरभ पेणकर,अवधूत हर्डीकर इ. प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com