विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे- उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत
राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परिक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन आता पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नसून हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असल्याचा आरोप केलाय. तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असे म्हणत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आम्हाला काळजी आहे. हेच विद्यार्थी भविष्यामध्ये धडा शिकवतील. प्रतिज्ञापत्रात असा कुठेही उल्लेख नाही. त्यांना भिंगाच्या चष्म्यातून व्यवस्थित वाचायला सांगा. लेखी स्वरूपाने कळवावे, असे आहे. अनेक असे सोर्स आपल्याकडे आहेत त्यातून लेखी विद्यार्थी विद्यापीठांना कळवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय झालाय. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असेही सामंत म्हणाले
www.konkantoday.com