
योगाला आपल्या जीवनाचा भाग बनवा -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाच्या सावटात आज भारतासह जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोना व्हायरस आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम अर्थात श्वसनयंत्रणेवर हल्ला करतो. पण आपली श्वसनयंत्रणा मजबूत करण्यासाठी प्राणायाममुळे सर्वांत जास्त मदत मिळते. त्यासाठी रोज प्राणायाम करा. तसेच योग आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. विविध आसनांमुळे आपल्या शरिराची शक्ती आणि मेटाबॉलिझ्म अर्थात चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यासाठी योगाला आपल्या जीवनाचा भाग बनवा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
www.konkantoday.com