
भरमसाठ बील आल्यान राज्यातील अनेक ठिकाणी नागरीक हैराण
लॉकडाऊनच्या काळात मागील ३ महिन्यांपासून राज्यातील वीज ग्राहकांना विजेचे बील आले नाही. मात्र, आता एकाच वेळी भरमसाठ बील आल्याने नवी मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी नागरीक हैराण झाले आहेत . कोरोनाच्या संकटात हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांच्या पगारात कपात झाली आहे. असं असतानाच आता या अवाजवी बिलांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे.लॉकडाऊननंतर आलेली ही बिलं अव्वाच्या सव्वा असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. त्याचा मेळ आता कसा घालणार हा प्रश्न वीज ग्राहकांसमोरील मोठा प्रश्न आहे. आधी एखाद्या ग्राहकाला सरासरी ३०० रुपये बील येत असेल, तर त्याला ७००रुपये बील आकारले गेले आहे. त्यामुळे ही बिलं कमी करण्यासाठी ग्राहकांना आता वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार आहेत.
www.konkantoday.com