देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ,शनिवारी एकाच दिवसात १४,५१६ नवे रुग्ण
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून शनिवारी एकाच दिवसात १४,५१६ नवे रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंतचा एका दिवसातील उच्चांक असून एकूण रुग्णसंख्या तीन लाख ९५ हजार ४८ झाली आहे. कोरोनामुळे देशात १२,९४८ जणांचा मृत्यू झाला असून शनिवारी ३७५ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. एकीकडे नव्या रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच निम्मे रुग्ण, सुमारे दोन लाख १३ हजार ८३० जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात एक लाख ६८ हजार २६९ रुग्ण उपचार घेत आहेत.
www.konkantoday.com