अॅक्टिव्हा स्कूटर विकण्याचे आमिष दाखवून ३१हजारांची फसवणूक
मिरजोळे जांभूळ फाटा येथील राहणारे सुनील गजानन गुरव यांना एक्टिवा स्कूटर विकण्याचे आमिष दाखवून आरोपी सिमन कुमार नावाच्या इसमाने त्यांच्याकडून ३१हजार रुपये ऑनलाइन घेऊन त्यांची फसवणूक केलेची घटना घडली आहे.आरोपी सिमन कुमार असे नाव सांगणाऱ्या आरोपीने अॅपवर आपली होंडा अॅक्टिव्हा गाडी विकण्याबाबत जाहिरात टाकली होती
ही जाहिरात वाचून फिर्यादी सुनील गुरव यांनी जाहिरीतीतील दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधला व आपल्याला ही स्कूटर पसंत असून घ्यायची आहे असे सांगितले आरोपीने ही गाडी देतो असे सांगून फिर्याद सुनील गुरव यांचे कडून गुगल पे द्वारे आपल्या खात्यात ३१हजार रुपये जमा करून घेतले प्रत्यक्षात कोणतीही स्कूटर दिली नाही यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गुरव यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com