सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला वैद्यकीय महाविद्यालय देणार-मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात एकुण 3 कोटी 21 लाख 83 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उद्घाटन आज केले.
या कार्यक्रमादरम्यान ना.सामंत यांनी मा.मुख्यमंत्री ना.श्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी मागणी केली व याकरिता आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,आणि या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव येत्या महिन्याभरात तातडीने शासनास सादर करण्यात येईल. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल,असे सांगितले.
या वेळी मा.मुख्यमंत्री यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी देखील आपण पूर्ण करु असे सांगितले.ना.उदय सामंत यांनी केलेल्या मागणीसाठी शासन नेहमीच आपल्या सोबत राहील असे मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.