रेशनदुकानातील धान्याचा अपहार, शासनाची ७४ हजार रुपयांची फसवणूक, दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल
गुहागर तालुक्यातील मौजे पाचेरी सडा येथील रेशन दुकानातील कार्डावर कमी धान्य दिले जाते व ऑनलाईनवर जास्त धान्य दाखवून शासनाची फसवणूक करणार्या रेशन दुकानदार विश्वास खरे व श्रीकृष्ण सावरकर या दोनजणांविरूद्ध गुहागर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचेरी सडा गावातील शंकर डिंगणकर, संतोष आंब्रे, प्रकाश डिंगणकर, अनिल जोशी, दिलीप डिंगणकर यांनी पाचेरी सडा रेशन दुकानात कमी धान्य दिले जाते व ऑनलाईनवर जास्त धान्य खतवले जाते. असा गुहागर तहसिलदारांकडे अर्ज केला होता. त्यामुळे गुहागर पुरवठा विभागातील अव्वल कारकून माधव कलसे यांनी या रेशन दुकानाला भेट दिली. व तेथील रजिस्टर व ऑनलाईनची तपासणी केली. त्यामध्ये २४६३ किलो धान्य रेशनदुकानदारांनी लोकांना न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून शासनाची ७४१५५ रुपयांची फसवणूक केली. म्हणून या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com