
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घनकचरा प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे प्रांतांचे आदेश
राजापूर ः राजापूर नगर परिषदेच्या हर्डी येथील घनकचरा प्रकल्पाबाबत हर्डीतील ग्रामस्थ संदीप पुजारी यांनी केलेल्या तक्रारीवरून प्रांताधिकारी प्रविण खाडे यांनी याप्रकरणी चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राजापूर नगरपरिषदेचा हर्डी येथील घनकचरा प्रकल्प पुन्हा अडचणीत सापडला आहे.
दरम्यान राजापूर नगरपरिषद घनकचरा प्रकल्पाच्या नावाखाली बेकायदेशीर कचरा डंपिंग करून त्यातील कचरा व घाण लगतच्या जागेत टाकत आहेत.