
भरकटलेल्या जहाजाची तपासणी पूर्ण, पुढील काही दिवसात जहाज बाहेर काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू, अमावास्येच्या भरतीचा मोठा धोका
निसर्ग चक्रीवादळामुळे मिर्या समुद्रकिनारी भरकटलेल्या जहाजाची प्राथमिक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. समुद्रातून जहाज बाहेर काढण्याबाबतच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. मात्र सध्या हे जहाज मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याजवळ आहे. अमावास्येच्या भरतीच्यावेळी या ठिकाणी तीन ते चार मीटरच्या लाटा उसळतात. त्यामुळे या जहाजाचा धोका आणखी वाढला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून भरकटलेले जहाज मिर्या समुद्रकिनारी असल्याने लाटांच्या मार्याने त्याचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जळक्या आईलची गळती थांबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे ऑईल बोटीतून बाहेर काढले जाणार आहे. सुमारे २५ हजार लिटर डिझेल सुरक्षित आहे.
जहाजावरील १३ खलाशी बाहेरून आल्याने त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्याने खलाशांना सोडण्यात आले आहे. पोलीस, सीमा शुल्क विभागामार्फत चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खलाशांना जहाजावर जाण्याची परवानगी देण्यात आली. सलग तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जहाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
www.konkantoday.com
