बोरसई मोहल्ला (सैतवडे) येथे विजेचा खांब धोकादायक, ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा
सैतवडे गावातील बोरसई मोहल्ल्यातील विजेचा खांब धोकादायक बनला आहे. विजेचा खांब खालुन पुर्णतः गंजुन गेला आहे. खांब गंजल्याने कधी ही पडण्याची शक्यता आहे. ईथल्या ग्रामस्थांनी याची कल्पना महावितरणला दिली आहे मात्र याला महावितरणकडुन केराची टोपली दाखवण्यात आली. महावितरण या गंजलेल्या खांबाकडे लक्षत देत नाही असे ईथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या पावसाळा सुरु आहे,जर मोठा वारा किंवा निसर्ग वादळासारखे पुन्हा वादळ आले तर हा विजेचा खांब कधी ही कोसळु शकतो. आजु बाजुला घरे असल्याने जिवित वा वित्तहानी ही होऊ शकते. जर वेळीच हा खांब गेला नाही तर आंदोलनाचा ईशारा ईथल्या ग्रामस्थांनी दिला आहे.
www.konkantoday.com