
पावसापूर्वी रस्ता उखडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट यावर्षीही धोकादायक
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात सुमारे ३० मीटरचा रस्ता पावसात पूर्णपणे उखडल्यामुळे जीवघेणा अपघात होण्याची शक्यता आहे. महामार्गाचे कॉंक्रीटीकरण करताना ठेकेदाराने हा पट्टा पावसाचे पाणी मुरावे म्हणून तसाच ठेवला आहे. मात्र हे करताना मातीचा रस्ता उखडू नये यासाठी कोणतीच खबरदारी न घेतल्याने एखाद्याचा जीव गेल्यावर खबरदारी घेतली जाणार आहे का? असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com