रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे दोन ठिकाणी गुटखा व तंबाखू पकडले, अंदाजे ५० हजार रुपयांचा माल जप्त
रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे रियाज रशीद महालदार यांच्या दुकानावर धाड घालून गुटखा, तंबाखू, पानमसाला असा प्रतिबंधीत अन्न पदार्थांची बेकायदेशीरपणे साठवणूक केली म्हणून त्यांच्या येथून २२३८९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच लांजा येथे तेलीवाडी येथील सुभद्रा किराणा दुकानात गुटखा, तंबाखू व पानमसाला या अन्नपदार्थांचा२३ हजाराचा बेकायदेशीर साठा विक्रीसाठी ठेवल्याच्या आरोपावरून संजय वाघाटे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com