पावस तेलीवाडी मार्गे गणेशगुळेकडे जाणार्या रस्त्याची गटारे व साईडपट्टी खचली
रत्नागिरी तालुक्यातील पावस तेलीवाडी मार्गे गणेशगुळेकडे जाणार्या रस्त्यावरील साईडपट्टी, गटार खचल्याने सदरचा मार्ग धोकादायक झाला आहे. साईडपट्टीसह गटारांची देखभाल दुरूस्ती बांधकाम विभागाने वेळीच न केल्यास अंतर्गत मार्ग कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे.
पावसच्या श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरापासून गणेशगुळे पर्यटनस्थळ, समुद्रकिनारी जाणार्या रस्त्यांची साईडपट्टी पूर्णतः खचली आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाचा भाग दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत आहे. तेलीवाडी परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे अनेकदा निवेदन देवून खचलेली गटारे साईडपट्ट्यांचे पुरावे सादर केले होते. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे साईडपट्टीसह रस्ता खचू लागला आहे.
www.konkantoday.com